आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खड्यांचा रास्ता:धुळे चौफुलीजवळील रस्ता खड्डेमय; अपघाताचे प्रमाण वाढले

नंदुरबार11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील धुळे चौफुलीजवळ रस्ता प्रचंड खराब झाला असून रेतीच्या वाहतुकीमुळे या भागातील रस्ते नेहमीच खराब होऊन खड्डे पडतात. या खड्डयांमुळेच या परिसरात अपघाताचे प्रमाण वाढले असून वाढते अतिक्रमण, वाढणारी वाहनांची कोंडी त्याच बरोबर रस्त्यांवरील खड्डे ही डोकेदुखी ठरू लागली आहे.

शहादा बाय पास रस्त्यावर वाहतूक वाढली असून गुजरातची रेती नाशिक, धुळे, औरंगाबादकडे नेतांना याच रस्त्याचा उपयोग केला जातो. धुळे चौफुलीवर तर चारही बाजूंनी वाहतुकीची काेंडी होत असते. वाघेश्वरी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या पायथ्याशी तसेच अवलगाझी जवळील रस्त्यांवर खड्डे पडल्याने अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. मध्यंतरी खड्डे बूजवण्यात आले होते. तसेच रस्ताही तयार करण्यात आला होता.

आता पुन्हा रस्ते खड्डेमय झाले असून सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरूस्तीकडे लक्ष द्यावे.याभागात मोठया प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. याच रस्त्यावर मोठे खड्डे आहेत. त्यामुळे वाहनांचा अपघात होऊ शकतो. खड्डे तात्काळ बुजवण्यात यावेत, अशी मागणी अनिल पाटील यांनी दिव्य मराठी शी बोलताना व्यक्त केली. हा रस्ता डाव्या बाजूने खराब झाला आहे. रस्त्याची अनेकदा डागडुजी केली जाते, पण रेतीच्या गाड्यांमध्ये रस्त्यांचे तीन तेरा वाजतात.

बातम्या आणखी आहेत...