आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:समाज बांधवांनी मुलींना शिकवावे; प्रा. मीनल पाटील यांचे आवाहन

तळोदा19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्याकडे कितीही शेती असू द्या वाटणी पडल्यानंतर ती शेती कमी होत जाते; परंतु शिक्षणाच्या बाबतीत तसे होत नाही. शिक्षणाच्या जोरावर तुम्ही नवीन टेक्नॉलॉजीनुसार शेती करू शकतात. समाज बांधवांनी आपल्या मुलांना जास्तीत जास्त शिकवावे. तर समाज बांधवांनी मुलींना शिकवावे, असे आवाहन प्रा. मीनल पाटील यांनी केले.

तळोदा तालुक्यातील अमलाड येथील कनकेश्वर मंदिर सभागृहात दोडे गुजर संस्थानची सर्वसाधारण सभा झाली. यावेळी त्या बोलत होते. अध्यक्षस्थानी दोडे गुजर समाज संस्थानचे अध्यक्ष यशवंतभाई पटेल होते. प्रमुख अतिथी म्हणून दोडे गुजर संस्थानचे माजी अध्यक्ष तथा विश्वस्त डायाभाई चौधरी, माजी उपाध्यक्ष बापू पाटील, रघुवीर चौधरी, हिंमत पटेल अॅड. स्वाती पाटील, कन्हय्यालाल पटेल, सुरेश पाटील, सचिव रणधीर पटेल, व्ही. के. पाटील, नवोदय विद्यालय कन्नडचे शिक्षक रवींद्र पाटील, योगेश चव्हाण, समाज संस्थानचे माजी अध्यक्ष ईश्वरलाल पाटील, माजी विश्वस्त सुरेश पाटील, तुंबडे पाटील, कृष्णदास पाटील आदींसह समाजबांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक बापू पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. मीनल पाटील व भावेश पाटील यांनी केले.

नूतन कार्यकारिणीची निवड : नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यात नवनिर्वाचित विश्वस्त म्हणून यशवंतभाई पटेल (बाळदे), प्रा. एन. डी. पाटील (सुलवाडे), डायाभाई चौधरी (चिनोदा), रघुवीर चौधरी (मोरवड), बापू पाटील (धानोरा), सुभाष पाटील (बाळदे), अरुण पाटील (तळवे), ज्ञानेश्वर पटेल (सदगव्हाण), योगेश पाटील (तळोदा), भूषण चव्हाण (वडाळी), भावेश पाटील, प्रा. मीनल पाटील (नंदुरबार), ॲड. स्वाती पाटील (तळवे) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...