आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:छत्रपती शिवरायांवरील वक्तव्याचा केला निषेध

नंदुरबार10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराजांचा जाहीररीत्या अवमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची महाराष्ट्रातून हकालपट्टी करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी मार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी निवेदन स्वीकारले.मराठवाडा विद्यापीठातील दीक्षांत समारंभात बोलताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एकेरी उल्लेख करत त्यांची तुलना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी केली.

तसेच महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज जुने काळातील होऊन गेलेले असे म्हणत त्यांचा अवमान केल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

समस्त शिवप्रेमी व बहुजन समाजाच्या भावनांच्या अवमान केला असून, अशा महापुरुषांच्या विरोधी मानसिकतेच्या राज्यपालांची फुले, शाहू, छत्रपतींच्या पुरोगामी महाराष्ट्रातून हकालपट्टी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यांची हकालपट्टी न झाल्यास जन आंदोलन करू असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष अरुण रामराजे, जिल्हाध्यक्ष डी. बी. पाटील, दिनेश सामुद्रे, आप्पा बैसाणे, अजय पाटील, विशाल सामुद्रे, श्यामराव पाटील, राजू पाटील, राजेश मेटकर यांच्या सह्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...