आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवा महोत्सवाचे आयोजन:लोकगीतांवर थिरकली तरुणींची पावले

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
छाया: नितीन पाटील, नंदुरबार - Divya Marathi
छाया: नितीन पाटील, नंदुरबार

जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे १५ ते २९ या वयोगटातील युवा वर्गातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एन. के. भदाणे होते. उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्याध्यापक सुभाष चौधरी, पर्यवेक्षक पंकज पाठक, विपुल दिवाण, तालुका क्रीडा अधिकारी, आत्माराम बोथीकर उपस्थित होते.

सुनीता चव्हाण, अनघा जोशी, दीपाली रोकडे व राहुल खेडकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. तसेच सूत्रसंचालन विशाल मच्छले केले तर आभार मयूर ठाकरे यांनी केले. सदर युवा महोत्सव यशस्वी करण्यासाठी क्रीडा कार्यालयाचे मुकेश बारी, डी.आर. हायस्कूलचे जगदीश बच्छाव, नीलेश गावित, गजानन अहिरे, खंडू जाधव व देवेंद्र कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.

२० कलाकार सहभागी : जिल्हास्तरीय महोत्सवात लोकनृत्य २० कलाकार व लोकगीतमध्ये १० कलाकारांनी सहभाग घेतला. लोकगीत या प्रकारात पोवाडा सादर करत डी.आर. हायस्कूलचा संघ विजयी तर लोकनृत्य या प्रकारात पावरी नृत्य सादर करत श्रीमती हि. गो. श्रॉफ हायस्कूलच्या संघ विजयी झाला.

बातम्या आणखी आहेत...