आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासातपुड्यात गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या होलिकोत्सवाची सांगता भोगवाडा (ता. धडगाव) येथील होळी साजरी करून करण्यात आली. दोन आठवड्यांपासून सातपुड्यातील चैतन्यमय वातावरणात होळी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोना महामारीच्या संकटानंतरचा पहिलाच होलिकोत्सव होता. सातपुड्यात गेल्या महिन्याभरापासून घुमत असलेल्या होळी गीतांचे मंजूळ आवाजातील स्वर व ढोलाच्या ठेक्यावर विशिष्ट पारंपरिक नृत्य करताना कमरेला बांधलेल्या घुंगरूंच्या खळणारा आवाज बंद झाला आहे.
सातपुड्यातील होलिकोत्सव महाराष्ट्रसह मध्य प्रदेश, गुजरात राज्यासह सर्वदूर प्रसिद्ध आहे. सातपुड्यातील अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यात पारंपरिक पद्धतीने गेल्या शेकडो वर्षांपासून उत्साहात साजरा होतो. सातपुड्यातील प्रत्येक अाबालवृद्ध आदिवासी बांधव या उत्सवामध्ये मनोभावे सहभागी होत असतो. २ मार्च रोजी सर्वप्रथम मानाची असलेली अक्कलकुवा तालुक्यातील डाब येथील मोरीराही येथील देवाची होळी प्रज्वलित होऊन सातपुड्यातील या अभूतपूर्व उत्सवाला सुरुवात झाली होती. दि. ३ मार्च रोजी अक्कलकुवा तालुक्यातील तोडीकुंड, धडगाव तालुक्यातील पाडली काकरपाटी, अस्तंबा, ४ मार्च रोजी धडगाव तालुक्यातील मेवढी पाडली, लहान रमसुला, गोऱ्य, दि. ५ मार्च रोजी धडगाव तालुक्यातील कालिबेल, अस्तंबा, अक्कलकुवा तालुक्यातील ऊर्मिलामाळ, ६ मार्च रोजी राजाला मान असलेल्या प्रसिद्ध अक्कलकुवा तालुक्यातील काठी येथील संस्थानिकांची राजवाडी होळी झाली.
होळीला नवस केलेली वेशभूषा उतरवली
सातपुड्यात साजरा होणाऱ्या या होलिकोत्सवात गावातील काही व्यक्ती होळीला नवस केलेल्या पारंपरिक वेशभूषा मोरखी, बावा, बुध्या, धानका, दोडे यांनी आपली वेशभूषा तसेच दोन आठवड्यांपासून केलेली पाळणी विधिवतपणे सोडून आपल्या सामान्य दैनंदिन जीवनात रूपांतरित केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.