आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन सरकार:शिक्षकांचा त्रास कमी झालेला नाही

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नवीन सरकार आले तरीही शिक्षकांचा त्रास काही कमी झालेला नाही. शिक्षकांना इतर कामे सोपवू नका. शिक्षणाच्या गुणवत्तेवर आम्हाला लक्ष केंद्रित करू द्या. आमदार प्रशांत बंबांनी शिक्षकांच्या बाबतीत जे वक्तव्य केले ते चुकीचे असून शहाणे लोकप्रतिनिधी कधीच गुरुजींच्या नादी लागत नाहीत. कारण त्यांना गुरुजींच्या ताकदीच्या अंदाज असतो.

राज्यातील सर्वच संघटना १७ सप्टेंबर रोजी आंदोलनाचा पवित्रा घेणार आहेत. या मोर्चाच्या माध्यमातून शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले जाणार आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अंबादास वाझे यांनी केले. ते त्रैवार्षिक अधिवेशनात बोलत होते. या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघांचे त्रैवार्षिक अधिवेशनात आबा जगताप, वसंत पाटील, राज्य सचिव आबासाहेब जगताप, धुळे जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय पोतदार, सहसचिव किशोर पाटील आदी उपस्थित होते. आंबादास वाझे म्हणाले,शिक्षक निवासी थांबत नसल्याने घर भाडे रद्द करण्याचा डाव आखण्यात येत आहे. मात्र घर भाडे मिळणे हा प्रत्येक शिक्षकांचा हक्क आहे. शिक्षकांच्या अनेक प्रलंबित मागण्या आहेत. शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत.त्या भराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

शिक्षक आमदारासाठी मतदानाचा अधिकार मिळावा
शिक्षक आमदाराला मतदान करण्याचा अधिकार हा प्राथमिक शिक्षकाला मिळायला हवा. यासाठी शिक्षक संघ लढा देणार आहे. शिक्षक शाळा डिजिटल करतो. मात्र लोकप्रतिनिधींनी असे डिजिटल वर्ग करण्याचे जाहीर केले आहे का? आदिवासी भागात अनेक शाळा गळक्या आहेत. त्यांच्या इमारती कोण बांधून देणार? सुविधाच नसेल तर शिक्षणात गुणवत्ता येणार कुठून? असा प्रश्न वाझे यांनी उपस्थित केला.

बातम्या आणखी आहेत...