आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआता पूर्वीप्रमाणे उन्हाळ्यात सुरू होणाऱ्या पाणपोई नामशेष झाल्या आहेत. मात्र कापडणे येथील सर्वसाधारण चहा टपरी चालकाने बसस्थानकासमोर असलेल्या चहा दुकानाच्या बाहेर पाण्याचे जार ठेवून संपूर्ण उन्हाळ्यात येणाऱ्या जाणाऱ्यांची तहान भागवली आहे. कापडणे येथील मुख्य भवानी चौकात विजय रतन माळी यांची चहा दुकान आहे.
याठिकाणी बस थांबा असल्याने दिवसभर प्रवाशांची व ग्रामस्थांची वर्दळ असते. याच रस्त्याने शाळाही असल्याने व धुळ्यात जाणारे महाविद्यालयीन तरुणही याच ठिकाणी गाडीच्या प्रतीक्षेत थांबतात. मात्र याठिकाणी कुणाला पाण्याची तहान लागली तर इतर परिसरातील हॉटेलमध्ये जावं लागते. मात्र त्याठिकाणी महिला व मुली जाण्यास धजावतात नाहीत. म्हणून या लहानशा व्यावसायिकाने संपूर्ण उन्हाळ्यात येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांसाठी, प्रवाशांसाठी व रिक्षा चालकांसाठी मोफत फिल्टर पाण्याची सोय उपलब्ध करून दिली.
अक्षय तृतियेच्या दुसऱ्या दिवशी पाच दिवस भरणाऱ्या यात्रेच्या काळातही जास्तीचे जार मागवून यात्रेतील भाविकांची तहान या छोट्या व्यावसायिकाने भागवली. आपले स्वतःच व्यवसाय लहान मात्र विदायक वृत्ती वापरून विजय माळी यांनी संपूर्ण उन्हाळ्यात मोफत पाणी सेवा दिली. यासाठी विजय माळी यांना स्वतःच्या व्यवसायासाठी पन्नास रुपयांचे पाणी पुरेसे होते. मात्र जनसेवेसाठी त्यांनी दरदिवशी अडीचशे ते तीनशे रुपये पाण्यासाठी खर्च केले आहेत. त्यांच्या या विदायक कामाचे गावातील ग्रामस्थांनी कौतुक केले आहे. या कामातून आपल्याला आत्मिक समाधान मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
दिवसभरात निराधार आणि गतिमंदांनाही देतात मोफत चहा
विजय माळी यांची परिस्थिती सर्वसाधारण आहे. वडील आणि भाऊ भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात तर विजय माळी यांनी भवानी चौकात चहाची टपरी टाकली आहे. दिवसभरात निराधार व गतिमंद लोकांना देखील न सांगता रोज मोफत चहा विजय माळी देत असतात.
जनसेवेतून मिळतो आनंद
लहान पणापासून वारकरी संप्रदायात आहे. भवानी भजनी मंडळाच्या मार्फत होणाऱ्या कीर्तन सप्ताहात देखील मोफत चहा पाण्याची सुविधा पुरवली जाते. पांडुरंगाच्या आशीर्वादाने जनसेवा करण्यात आनंद मिळतो. कीर्तनाची मोठी आवड आहे.
विजय रतन माळी, कापडणे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.