आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय वायू सेना अकादमी हैद्राबाद येथे पार पडलेल्या पासिंग ऑफ परेडमध्ये नंदुरबार येथील जिल्हा परीषदेचे प्राथमिक शिक्षक नितीन पवार यांचे सुपुत्र कुणाल पवार यांस फ्लाईंग ऑफिसर म्हणून नियुक्ती प्रदान करण्यात आली. भारतीय लष्कर प्रमुख मनोज पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा पार पडला. कुणालच्या रूपाने कमी वयात वायू सेनेत जाणारा नंदुरबार जिल्ह्यातील पहिला पायलट ठरला. कुणाल पवारय यांची २०२० मध्ये वयाच्या २१ व्या वर्षी भारतीय वायुसेनेत निवड झाली.
दोन वर्ष खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तो भारतीय वायु सेनेत त्याची पायलट म्हणून १८ जून रोजी नियुक्ती करण्यात आली. कुणालचे दहावी पर्यंतचे शिक्षण नंदुरबार येथे झाले. त्यानंतर अकरावी व बारावी औरंगाबाद येथे सैनिकी पूर्व प्रशिक्षण केंद्रात झाले. त्यानंतर पुणे विद्यापीठात बीएससी भौतिक शास्त्रात पदवी संपादन केली. बीएससीला असतानाच त्याची भारतीय वायू सेनेमार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत तो उत्तीर्ण झाला. एसएसबीमध्ये तो एकमेव विद्यार्थी पहिल्याच वर्षी उत्तीर्ण झाला. त्यानंतर डेहराडून येथे पायलट पात्रतेसाठी लागणारे पीएबीबी हे शिक्षण तो उत्तीर्ण झाला. त्यानंतर विविध शिक्षण प्रक्रिया पूर्ण करीत तो आज पायलट पदावर पोहोचलाय.
फायटर विमान, चॉपरच्या चित्तथरारक कसरती
भारतीय वायू सेनेत उच्च पदस्थ अधिकारी पदापर्यंत पेाहचण्याचे स्वप्न पाहणाऱ्या व वयाच्या २३ व्या वर्षी पायलट पदापर्यंत पोहचलेल्या कुणाल पवार याने चित्तथरारक फायटर विमान, चॉपर याच्या कसरती केल्या. वरीष्ठ अधिकाऱ्यांनी त्याच्या कसरतीचे कौतूक केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.