आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:प्रेमविवाह केल्याने मुलीकडच्यांनी घरात घुसून केली तिघांना मारहाण; 10 जणांवर केला गुन्हा दाखल

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

युवकाने युवतीशी प्रेम करून शासन दरबारी नाेंदणी पद्धतीने विवाह केल्याने संतप्त झालेल्या मुलीकडच्या नातेवाइकांनी घरात घुसून पती-पत्नीस मारहाण केली. मुलीला ओढत नेताना तिने जाण्यास नकार दिल्याने दोघांना डेंगाऱ्याने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रार दाखल झाल्याने १० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पंकज ईश्वर मोरे याने रावण रामदास बाविस्कर यांच्या मुलीशी प्रेम झाल्याने त्याने तिच्याशी नोंदणी पद्धतीने विवाह केला. यानंतर संतप्त झालेल्या रावण बाविस्कर यांच्यासह नातेवाइकांनी पंकज मोरेच्या घरात घुसून दीपिका मोरे हिला ओढण्याचा प्रयत्न केला. तिने येण्यास नकार देताच तिच्या गालावर मारले. पंकज ईश्वर मोरे व भाऊ गोविंद ईश्वर मोरे यांनाही मारहाण करण्यात आली. या प्रकरणी रावण रामदास बाविस्कर, संदीप रावण बाविस्कर, प्रशांत जिजाबराव बाविस्कर, तिघे रा. विटाई, ता.शिंदखेडा, सिद्धार्थ रवींद्र चव्हाण (वय २०), गणेश दगा वाघ (वय २०) व संदीप पीरन बैसाणे, तिघे रा.दभाशी, ता. शिंदखेडा या सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या मारहाणीच्या घटनेनंतर रिक्षाचालक रावण रामदास बाविस्कर यांनीही पोलिसांत तक्रार केली आहे. पंकज मोरे, ईश्वर मोरे, पंकज गोविंद मोरे, मनोहर मोरे यांनी जीवे ठार मारण्याच्या धमकीचा आरोप करत फिर्याद देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...