आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावारंटने झडती घेवून अवैधरीत्या मिळालेला माल जप्त केल्याने राग येऊन दाेघांनी वन अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. तसेच महिलेने विटांच्या तुकड्याने शासकीय वाहनावर हल्ला केला. यात वन कर्मचारी जखमी झाला असून चौघा आरोपींच्या विरोधात नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बारी, ता.नवापूर येथे घडली.
८ जून २०२२ रोजी वनरक्षक कमलेश नारद वसावे यांनी नवापूर पोलिसांत फिर्याद दिली. अवैधरीत्या मिळालेले डिझाईन मशिन वृक्षाचे तीन नग, चौपाट, साग वृक्षाचे दोन फलक जप्त करण्यास गेलेल्या वन कर्मचाऱ्यांच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली. यात वाहन (क्र. एमएच ३९ ए ०३१९)च्या काचा फुटल्या. वनरक्षक बिलाल रहमान शाह हे जखमी झाले. या प्रकरणाचा तपास पोउनि अशेाक मोकळ करत आहे. शासकीय कामात अडथळा घालणे, हुज्जत घालणे या आरोपाखाली या दोघांसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
जखमींवर उपचार करण्यात आले. ही कारवाई वनसंरक्षक दि.वा. पगार, कृष्णा भवर, विभागीय वन अधिकारी दक्षता, धुळे रेवती कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दरम्यान जखमी झालेले वनरक्षक बिलाल रहमान शाह यांच्यावर उपचार करण्यात येत असून पाेलिस आराेपींचा शाेध घेत आहेत.
महिला-पुरुषांच्या जमावाने आणला कारवाईमध्ये अडथळा
बारी गावातील ७० महिला व पुरुषांनी जमावाद्वारे एकत्रित येऊन या वेळी कारवाईत अडथळा निर्माण केला. गाडीजवळ उभे असलेले वनरक्षक बिलाल रेहमान शाह यांना हाताला दगड लागून मुका मार लागला. तसेच वीट व गाडीचे काच त्यांच्या हाताला लागल्याने रक्तस्राव सुरू झाला. सदर परिस्थितीचा अंदाज घेत सहाय्यक वन संरक्षक धनंजय पवार यांनी जमावाची समजूत काढत बारी गावातून स्टाफ व जप्त मुद्देमाल नवापूर विक्री आगार येथे आणल्याची आपबिती वन अधिकाऱ्याने सांगितली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.