आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आगग्रस्त कुटुंबाला गावाने दिला मदतीचा हात; सरपंच, ग्रामसेविका, ग्रामस्थांच्या पुढाकाराने निर्माण झाली आपलेपणाची भावना

शहादा17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील कोठलीतर्फे सारंगखेडा येथे गेल्या महिन्यात विधवा महिलेच्या घराला शॉर्टसर्किटने आग लागून संसारोपयोगी साहित्यासह रोख रक्कम व इतर सर्व वस्तू जळून राखरांगोळी झाली होती, अशा महिलेला प्रशासनाकडून नाहीतर ग्रामस्थांनी एक हात मदतीचा म्हणून कृपाछत्र म्हणून महिलेस संसारोपयोगी साहित्य देऊन आपलेपणाची भावना ग्रामस्थांकडून निर्माण केली आहे.

जिजाबाई अभिमन पाटील यांच्या घराला अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत घरातील सर्व जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या. शिवाय सर्व कुटुंबातील व्यक्तीचे कपडे, कागदपत्रेदेखील खाक झाले. जवळपास ६ गाळे घर जळाले होते. सदर आग विजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागली होती. महिला विधवा असून विविध कार्यकारी सोसायटीतून जवळपास पन्नास हजार रुपयांची रोख रक्कम दुसऱ्याला कर्जवसुली देण्यासाठी ठेवली होती, ती रक्कमही जळून खाक झाली होती. घरातील काही आवश्यक कागदपत्रे देखील जळून खाक झाली होती. त्या कुटुंबाला एक मदतीचा हात हवा होता.

अधिकारी येऊन गेले पण रुपयाची मदत मिळाली नाही, अशी खंत कुटुंबाने व्यक्त केली आहे. कोठली ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच गोकुळाबाई भालेराव पाटील, ग्रामसेविका योगिता निकम, उपसरपंच नम्रता सरदारसिंग गिरासे, ग्रामपंचायत सदस्य राहुल भालेराव पाटील, वनसिंग रामचंद्र भील, आशाबाई नवल भील, मीनाबाई जगन पाटील, नितीन युवराज पाटील, प्रमिलाबाई दिनेश कोळी, शरद झगा गवळे यांच्या वतीने सर्व संसारोपयोगी वस्तू नवीन खरेदी करून देण्यात आली. या वेळी हिलाल आनंदा पाटील, सामाजिक कार्यकर्ता ललित पाटील, ज्ञानेश्वर गवळे, सुनील भामरे, सुनंदाबाई रामकृष्ण मंडळे, ग्रामपंचायत शिपाई सोमा गवळे, रोजगारसेवक जिजाबराव साळवे, निखिल हिलाल पाटील, गौरव पाटील उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...