आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंती उत्सव:महात्मा बसवेश्वरांचे कार्य प्रेरणादायी; शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशींचे प्रतिपादन

नंदुरबार22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रांतीसूर्य, थोर समाज सुधारक व जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांचे कार्य शतकानुशतके समाजासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. आजच्या युवा पिढीने देखील सामाजिक समतेचे जननायक महात्मा बसवेश्वर महाराजांच्या विचारांचे अनुकरण करावे, असे आवाहन माजी आमदार तथा शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी केले.

येथील बालवीर चौकात महाराष्ट्र बसव परिषदेची जिल्हा शाखा, महाराष्ट्र राज्य वीरशैव लिंगायत गवळी समाज बहुउद्देशीय संस्था आणि शहीद शिरीषकुमार मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बसवेश्वर महाराजांच्या ८९१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार रघुवंशी यांनी गवळी समाजाच्या कार्याचे कौतुक करून समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र बसव परिषदेचे जिल्हाध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी केले तर सूत्रसंचालन भाग्यश्री अशोक यादबोले या विद्यार्थिनीने केले.

कार्यक्रमास कॉन्ट्रॅक्टर अनिल पाटील, जय हिंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहितसिंग राजपूत, प्रा.गंगाराम यादबोले, भटक्या विमुक्त हक्क परिषदेचे रामकृष्ण मोरे, जगन खेडकर, विनोद चौधरी, सुमानसिंह राजपूत, चेतन राजपूत, दीपक गोडळकर, हेमंत नागापुरे, यमाजी गवळी, अॅड.सुशील गवळी, विजय चौधरी, भास्कर रामोळे, वैभव करवंदकर, अतुल पतंगपूरे, डॉ.गणेश ढोले, डॉ.भूषण पालकडे, कैलास ढोले, ईश्वर घुगरे, बाबा यादबोले उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी संभाजी हिरणवाळे, गोपाल गवळी, प्रफुल्ल राजपूत, विशाल हिरणवाळे, सिद्धेश नागापुरे, आनंदा गवळी आदींनी परिश्रम घेतले. आभार अशोक यादबोले यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...