आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासातपुड्याच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिल्या गेलेल्या रावला पाणी येथील शहिदांच्या स्मारकासाठी निधी येऊन तीन वर्षे उलटली तरी हे स्मारक अजून पूर्ण झालेले नसल्याने या कामाला गती द्यावी अशी मागणी होत आहे. इंग्रजांनी धडगाव तालुक्यातील रावलापाणी परिसरात २ मार्च१९४३ मध्ये केलेल्या गोळीबारात १५ आदिवासी बांधवांना हुतात्मे पत्करावे लागले होते. तसेच यात २८ जण जखमी झाले होते. या ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार म्हणून रावलापाणी परिसरात ऐतिहासिक घटनास्थळी दगडांवर गोळ्यांच्या निशाणी अजून देखील आहेत. तत्कालीन नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी २ कोटी ६७ लाख निधी इतका निधी मंजूर केला होता.
मात्र तब्बल ३ वर्षे उलटूनही प्रशासन पातळीवर कामाला गती देण्यासाठी कोणत्याही हालचाली संबधित विभागाकडून करण्यात येत नाही. या भागात बांधकाम करताना पक्का रस्ता नसल्याने बांधकाम साहित्य आणणे अतिशय खडतर असल्याने हे स्मारक तयार करण्यासाठी अधिक वेळ लागत आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना विभागाकडून विचारणा केली असता त्यांनी सांगितले की रावला पाणी या ऐतिहासिक स्थळी जाण्याच्या रस्ता हा रस्ते विकास आराखडा अंतर्गत येत नसल्याकारणाने या रस्त्यासाठी लागणारा निधी मंजूरसाठी तांत्रिक अडचणी आहेत.
रस्ता नसल्याने येताय अडचणी
रावला पाणी हे ऐतिहासिक स्थळातून या स्थळाला भेटी देण्यासाठी असंख्य लोक येतात. मात्र रस्ता नसल्या कारणाने त्यांना पाच ते सहा किलोमीटर पायपीट करत या ठिकाणी यावे लागते. या भागात रस्ते व्यवस्थित नसल्याकारणाने स्मारकासाठी येणारे बांधकाम साहित्य आणताना अडचणीच्या सामना करावा लागतो. त्यामुळे रावला पाणी गावापर्यंत येणारा रस्ता हा डांबरीकरण करावा. - रतीलाल पावरा, सरपंच, रावलापाणी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.