आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:बोगद्यात साचलेले पाणी काढण्याचे काम वेगात; दुहेरी मार्ग सुरू होणार

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तब्बल तीन कोटी रूपये खर्च करूनही नळवा मार्गावरील रेल्वे बोगद्यात साचलेले पाणी आता नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून बाहेर काढण्यात येत असून मंगळवारी या बोगद्याचे उद्घाटन होणार आहे. यामुळे एकाच मार्गावर होणारी वाहतुकीची कोंडी कमी होऊन हा रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत होणार आहे. नंदुरबार शहरातील रेल्वे रुळापलीकडील ४० टक्के नागरिकांचे हाल थांबणार असून उड्डाणपुलावरील काही वाहतूकही या मार्गाने वळवण्यात येऊ शकते. यामुळे रहदारीच्या प्रश्नी काहीसा दिलासा मिळू शकेल.

नंदुरबार शहरातील नळवा मार्गावर रेल्वे मार्गाखालून भुयारी मार्ग काढण्यात आला आहे. राज्य शासनाने त्यासाठी तब्बल ३ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र पावसाळ्यात हा भुयारी मार्ग उपयोगात न आल्याने रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभारावर नाराजी व्यक्त होत आहे. अशात पावसाळा संपताच नगरपालिकेने त्यासाठी पुढाकार घेत साचलेले पाणी बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. कोरोना काळात रेल्वेच्या भुयारी मार्गाच्या कामाला सुरुवात करण्यात आली हाेती. बांधकाम दरम्यान या भागातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या बाजूचे बांधकाम ऑगस्ट महिन्यापूर्वी पूर्णत्वास आले. मात्र या दुहेरी भुयारी मार्गात पुन्हा पाणी साचल्याने एकाच मार्गाने दोन्ही बाजूंची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे वाहनचालकांना रोजच अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.

उद्या हाेणार बाेगद्याचे उद्घाटन उधना ते भुसावळ या रेल्वे मार्गावरील सर्वच भुयारी रस्ते अयशस्वी झाले आहेत. भुयारी रस्त्याचे पाणी काढण्याची जबाबदारी ही रेल्वे प्रशासनाची होती. पण रेल्वे अधिकाऱ्यांनी दुर्लक्षच केले होते. अखेर माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पुढाकार घेत पालिकेच्या वतीने साचलेले पाणी बाहेर काढण्यात येत आहे. मंगळवारी या बोगद्याचे उद्घाटन होणार आहे.

भुयारी मार्गासाठी तीन कोटी रुपये राज्य शासनाकडून खर्च करण्यात आले. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी निधी आणण्यासाठी पाठपुरावा केला होता. मात्र पैसा खर्च करूनही काहीच उपयोग झाला नसल्याची बाब समोर आली आहे. नंदुरबार शहरातील ४० टक्के वसाहत ही रेल्वे पुलाकडे वास्तव्यास आहे. या भागात जिजामाता महाविद्यालय, अनेक कॉलन्या, नवीन वसाहती आहेत. रेल्वे विभागाकडे बोगद्याच्या कामासाठी निधी दिला. मात्र तांत्रिक बाबी चुकल्याने हा मार्ग अजूनही नागरिकांच्या वापरासाठी खुला झालेला नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. रेल्वे प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्षच केले आहे.

बातम्या आणखी आहेत...