आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:नवापुरात तीन मंदिरांत चोरी; चोरटा पोलिसांच्या ताब्यात

नवापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील नवीन महादेव मंदिर, शनिमंदिर, हनुमान मंदिर येथील चोरट्याने शंख, घंटा, लोटे, दानपेटी चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरेत कैद झाली आहे.शुक्रवारी दुपारी नवीन महादेव मंदिरातून दानपेटीतील हजारो रुपये चोराने लंपास केले आहे. त्याचप्रमाणे मंदिर परिसरातील शिडी, तगारी, पावडी चार लोटे इत्यादी साहित्य देखील चोराने चोरी केलेली आहे.

नवापूर शहरात शनिवारी सकाळी पुन्हा चोरटा मंदिरात आल्याने नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांचा स्वाधीन केले. त्याचप्रमाणे नवापूर शहरातील सरदार चौकातील सोन्या मारूती व शनी मंदिर येथे घंटा, शंख देखील चोरी केलेली आहे.त्यानंतर रंगावली नदीकिनारी असलेल्या हनुमान मंदिरातील घंटा देखील चोरीला गेला आहे. ही सर्व घटना आठवड्याभरात घडलेली आहे.

बातम्या आणखी आहेत...