आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:शहादा शहारात दोन ठिकाणी चोरी

शहादा8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात दोन ठिकाणी घरफोडी झाली असून चोरट्यांनी यात सुमारे दीड लाखांचा ऐवज चोरून नेल्या आहे. यात आदर्श नगर भागात सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरी दीड तोळे सोने, पाच हजार रुपये रोख, एक एलईडी टीव्ही तर गरीब नवाज कॉलनीत घरातून ५० हजारांची रोकड लांबवली आहे. शहरातील आदर्श नगर भागात विनायक बाविस्कर या शिक्षकाच्या घरी चोरी झाली. बाविस्कर हे गुरुवारी आपल्या खाजगी कामानिमित्त गावी गेले होते. चोरट्यांनी कपाटाची पाच हजार रुपये रोख, सुमारे ७५ हजार रुपये किमतीचे दीड तोळे सोने, ३० हजारांचा एलईडी टीव्ही चोरून नेल्याचे स्पष्ट झाले.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे, निरीक्षक अंसाराम आगरकर यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे कर्मचारी व ठसे तज्ञांचे दिनेश लाडकरसह पथकाने येऊन पंचनामा केला. उशिरापर्यंत गुन्हा दाखलचे काम सुरू होते. दरम्यान, गरीब नवाज कॉलनीतील मिसबा मशिदी जवळील अल्ताफ सलीम पिंजारी यांच्या घराच्या मागील बाजूसच्या दरवाजाचे कुलूप तोडून ५० हजारांची रोकड लांबवली. पिंजारींच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...