आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:लहान शहादा शिवारातून 40 किलो कापसाची चोरी

नंदुरबार14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील लहान शहादा शिवारात शेतात ठेवलेला ४० किलो कापूस चोरीस गेला असून शेतकरी किरण मोहन चौधरी यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. कापूस चोरी संदर्भात एकावर संशय असून, त्याच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्या संशयित व्यक्तीची चौकशी करण्यात येत आहे. शहादा व नंदुरबार तालुक्यातील शेतात उभे पीक चोरून नेले जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. पोलिस हवालदार सुनील येलवे यांच्याकडे तपास देण्यात आला आहे. पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...