आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:पाच किलो साेनेमिश्रित‎ मातीची दुकानातून चोरी‎

नंदुरबार‎10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील सराफ बाजारातील श्री‎ जी दीपज्योती डाय कटर्स पावाच्या‎ सोन्याच्या दुकानातून पाच किलो‎ सोने मिश्रित माती चोरून नेल्याने‎ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल‎ करण्यात आला आहे. या सोने‎ मिश्रित मातीची किंमत साडे तीन‎ लाख रुपये असल्याचे सांगण्यात‎ आले. सोने मिश्रित माती चोरल्याची‎ नंदुरबार शहरातील ही पहिलीच‎ घटना असावी.

या प्रकरणी यज्ञेश‎ महेश सोनी यांनी पोलिस ठाण्यात‎ फिर्याद दिली आहे. ही चोरी चार‎ अनोखळी चोरट्यांनी केल्याचा‎ प्राथमिक अंदाज आहे. पोसई‎ स्नेहदीप शिंदे यांच्याकडे तपास‎ देण्यात आला आहे. २६ फेब्रुवारी‎ रोजी चोरीची घटना घडली असली‎ तरी या प्रकरणी उशिराने फिर्याद‎ दिल्याने गुन्हा दाखल केला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...