आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिकांची स्थिती उत्तम:शहादा शहरासह परिसरात हिरवी मिरची उत्पादनामध्ये झाली वाढ

शहादा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरासह परिसरात हिरव्या मिरचीच्या उत्पादनात वाढ झाली आहे. यामुळे चांगले उत्पन्न मिळण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने सर्वच पिकांची स्थिती उत्तम आहे. शहादा तालुक्यात ६० ते ६५ टक्के शेतकऱ्यांनी इतर पिकांसोबत मिरचीची लागवड केलेली आहे. उन्हाळ्यात लावलेली मिरची चांगल्या स्थितीत आहे.

शेतांतून मिरची निघू लागल्याने व्यापारी वर्ग हिरवी मिरची खरेदी करण्यासाठी शेताच्या बांधावर जात असल्याने मिरचीला चांगला भाव मिळत आहे. उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार जिल्हा मिरचीच्या उत्पादनात अग्रेसर आहे. लाल मिरची सांगितली म्हणजे नंदुरबार मिरचीचे आगार मानले जाते. शेतकरी शहादा शहरात आपल्या खासगी वाहनांनी हिरवी मिरची विक्रीसाठी रोज आणत आहेत. शेतकऱ्यांना रोखीने पैसा मिळत असल्याने विक्रीवर अधिक भर दिला आहे. बाजारात ३० ते ४० रुपये किलो प्रमाणे विक्री होत आहे.

बातम्या आणखी आहेत...