आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखासगत शेतातून राज्य महामार्ग काढल्याने हतबल शेतकऱ्यांनी ७ जानेवारीपासून वाहतूक बंद करण्याचा इशारा दिला हाेता. तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी तातडीने बैठक बोलावून शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकूण घेतले. तर न्यायालयात याचिका दाखल करून लढा देण्याचा संकल्प शेतकऱ्यांनी केला आहे. राज्यमहार्गाची वाहतूक बंद करू शकत नाही, असा निर्वाळा तहसीलदारांनी दिला. १०८१ मध्ये ढेकवद ते पाचोराबारी असा वहिवाट होती. ती पुढे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतर करण्यात आली. या रस्त्याचे रूपांतर राज्य महामार्गात करण्यात आली. रस्ता रुंदीकरण करताना शेतकऱ्यांना विचारणा करण्यात आली नाही. तसेच शेतकरी ३२ एकर शेत जमिनीचा शेतसारा सरकारच्या तिजोरीत भरत आहेत. तर त्याच खासगी शेतातून मात्र राज्य महामार्ग काढ ला आहे.
या शेतकऱ्यांना शासनाने कुठलाच मोबदला दिला नाही. यासंदर्भात ‘दिव्य मराठी’त ६ जानेवारी रोजी वृत्त प्रकाशित होताच प्रशासन खडबडून जागे झाले. बैठकीत वाहतूक बंद करू शकत नाही, असे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांचे म्हणणे आहे. अभियंता गणेश गावित म्हणाले, रस्ता दुरूस्त झाला नाही तर अपघातात मरणाऱ्यांची जबाबदारी शेतकऱ्यांवर राहील. तर शेतकरी धर्मेंद्र पाटील, नीलेश शाह,पिनल शाह, अंबालाल पटेल या चौघा शेतकऱ्यांनी हा लढा न्यायालयात लढण्याचा निर्णय घेतला. तीन दिवस बंदीचा निर्णय स्थगित केला. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने माहिती सोमवारी देण्याचे सांगितले.
शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेताना तहसीलदार भाऊसाहेब थोरात . तातडीने घेतली बैठक सार्वजनिक विभागाकडे जिल्हा परीषदेची वहिवाटीचा हा रस्ता हस्तांतर करण्यात आला. आता हा वहिवाटीचा मार्ग राज्य महामार्गात रूपांतरीत झाल्याने वाहतूक वाढली आहे. या मार्गाची दुरवस्था झाल्याने एका महिलेचा अपघातात मृत्यू झाला आहे. त्यामुळे सार्वजनिक विभागाने हा मार्ग दुरूस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु शेतकऱ्यांनी ७ जानेवारीपासून रस्त्याची वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला होता. ‘ दिव्य मराठी’त वृत्त प्रकाशित होताच प्रशासनाकडून बैठक घेण्यात आली. शेतकऱ्यांची परवानगी घेणे होते आवश्यक तहसिल कार्यालयात पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभाग, महसुल व शेतकऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. शेतातून रस्ता तयार करताना किमान शेतकऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक असताना शासनाने कुठलीच परवानगी घेतली नाही, असे पिनल शाह यांचे म्हणणे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.