आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:ज्ञानार्जनासाठी ग्रंथांशिवाय पर्याय नाही; जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे प्रतिपादन

नंदुरबार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्ञान ही एक शक्ती आहे, चांगल्या ज्ञानार्जनासाठा ग्रंथांशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी ग्रंथोत्सव-२०२२चे उद्घाटन प्रसंगी केले.राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय नंदुरबार ग्रंथोत्सवाचे उद्धाटन इंदिरा मंगल कार्यालय,नंदुरबार येथे खत्री यांच्या हस्ते झाले.

त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर शिक्षणाधिकारी एम.व्ही.कदम, मुख्याधिकारी अमोल बागूल, जिल्हा ग्रंथालय अधिकारी धरमसिंग वळवी, साहित्यिक प्रा.डॉ.पितांबर सरोदे, दिनानाथ मनोहर, डॉ. सुनंदा पाटील, प्रभाकर भावसार, आदिवासी मौखिक साहित्य परिषदचे संयोजक भिमसिंग वळवी, प्रा. लियाकत अली सय्यद, निंबाजीराव बागुल, प्रा.माधव कदम, प्रा.विष्णू जोधळे, श्रीराम दाऊतखाने, प्रविण पाटील आदी उपस्थित होते.

प्रथम सत्रात वाचन संस्कृती काल-आज-उद्या याविषयावर डॉ. सुनंदा पाटील व प्रभाकर भावसार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस जिल्हाधिकारी खत्री यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर खत्री यांनी विविध ग्रंथस्टॉलला भेट देवून पुस्तके खरेदी केली. आमदार आमश्या पाडवी यांनी ग्रंथोत्सवास भेट दिली. यावेळी संयोजन समितीच्यावतीने त्यांचे ग्रंथभेट देऊन स्वागत करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...