आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य धोक्यात:तळोदा तालुक्यामध्ये ताडीचे एकही झाड नाही, मात्र बनावट ताडी विक्री; ताडी पिणाऱ्या शौकिनांचे आरोग्य आले धोक्यात

तळोदा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तळोदा तालुक्यासह सातपुड्याच्या भागात ‘ताडी’चे शून्य उत्पादन होते. मात्र तिची विक्री हजारो लिटर्स होत असून, प्रशासनाने याकडे डोळेझाक केली आहे. तालुक्यासह परिसरात अत्यंत घातक रसायन व मादक पदार्थांच्या गोळ्या वापरून ताडी तयार केली जाते. त्यामुळे ताडी पिणाऱ्या शौकिनांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या ताडीच्या झाडापासून ‘नीरा’ हे पेय मिळते. मात्र काही काळानंतर नीराचे ताडी या मादक पदार्थात रूपांतर होते. याच ताडीची उत्पादन क्षमता असणारी झाडे अस्तित्वात नसली तरी दररोज हजारो लिटर ताडीची विक्री होते. रसायनमिश्रित मादक पदार्थांच्या गोळ्या वापरून तयार होणाऱ्या ताडीमुळे शौकिनांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे. याला राज्य उत्पादन शुल्कची डोळेझाक म्हणता येईल. शहर व तालुक्यात असंख्य ठिकाणी अधिकृत ताडी विक्री केंद्र आहेत. या दुकानांतून किती ताडी विक्री होते? याचा शोध घेणे आवश्यक आहे,मुंबईसह राज्यातील शहरी भागामागील काळात ताडी विक्रीवर बंदी घातली होती, राज्य सरकारने ताडी विक्रीवरील बंदीसाठी २०१६ साली एक अध्यादेश काढला होता. याच अध्यादेशाला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. तर तळोदा तालुक्यात ताडीचे एकही झाड नाहीत. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने याकडे गांभीर्याने पाहावे,अशी मागणी होत आहे.

बातम्या आणखी आहेत...