आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:बिअर शाॅपीमध्ये चोरट्याचा डल्ला

नवापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील बेडकीपाडा गावातील गुजरात-महाराष्ट्र सीमावर्ती भागातील सुमित बियर शाॅपीत भरदिवसा चोरी झाली आहे. दुपारी चोरट्याने डल्ला मारत ६०-७० हजार लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नवापूर आरटीओ जवळील सुमित बियर शाॅपी सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप गावित यांच्या मुलांची आहे.

सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांच्या मुलाच्या शाॅपीत चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास एक चोरटा ग्राहक म्हणून आला. पाण्याची मागणी केली. दुकानातील मॅनेजर पाणी घेण्यासाठी बाहेर गेला असता. बियर शाॅपीत कोणी नसल्याचा फायदा घेत गल्ल्यातील पैसे काढून नेले. सदर घटना सीसीटीव्ही कॅमेरेत कैद झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...