आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुकिंग:यंदा लग्न हंगामातील व्यवसायाला तेजी, सर्व मंगल कार्यालयांची बुकिंग

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोराेना काळात लग्नसराईवर आलेले संकट दूर होताच यंदा लग्नसाेहळ्यांची लगबग सुरू झाली आहे. नोव्हेंबर व डिसेंबर या दाेन्ही महिन्यात जवळपास प्रत्येक खासगी मंगल कार्यालयात २० लग्नांसाठी बुकिंग झाली असून यंदा लग्नसाेहळ्याचा खर्च २० ते ३० टक्के वाढला आहे. बँड, मजुरी, मंडप, मंगल कार्यालयाच्या खर्चात वाढ झाली असली तरी यंदाच्या लग्नाच्या हंगामात अपूर्व उत्साह दिसेल, असा कयास व्यक्त हाेताे.

दोन वर्षे कोराेना महामारीमुळे लग्न समारंभांवर बंदी आली होती. त्यामुळे लग्नांशी संबंधित अनेक व्यवसाय डबघाईस गेले. ऑर्केस्ट्रा कलावंतांवर तर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली होती. मंगल कार्यालयात ५० जणांनाच उपस्थितीचे नियम लादले होते. त्यामुळे कमी खर्चात लग्ने पार पडली. मात्र मंडप, पुरोहितांसह बँड, डिजे वादकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. परंतु कोराेना संपल्याने शनिवारी तुळशी विवाह पार पडल्यानंतर नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यांमध्ये प्रत्येक खासगी मंगल कार्यालय जवळपास प्रत्येकी २० लग्नसाेहळ्यांसाठी बुक झाले आहे.

कन्यादान मंगल कार्यालयाचे संचालक संदीप चौधरी म्हणाले, यंदा ३० टक्के भाव वाढ झाली आहे. १० हजारापासून १ लाखांपर्यंत बँड उपलब्ध होत आहे. व्हीडीओ कॅमेरे, फोटोग्राफर, भोजन बनवणाऱ्या कारागिरांना यंदा तेजीचे दिवस आहेत. ३० रुपये थाळी ही स्वयंपाकीची मजुरी आहे. त्यामुळे दोन हजार थाळी मागे ६० हजार रुपये स्वयंपाकीसाठी मोजावे मोजावे लागणार आहेत. मात्र तरी उत्साहात कमी झालेली नाही.

मंगल कार्यालयांतर्फे दिले जातेय पॅकेज
काही मंगल कार्यालयात तर पॅकेज देण्यात येत आहे. ५०० जणांच्या उपस्थित होणाऱ्या लग्नासाठी २ लाखांचे पॅकेज आहे. तर १००० वऱ्हाड्यांसाठी सव्वा तीन लाख रुपयांचे पॅकेज देण्यात येत आहे. यात बँड वगळता सर्व खर्च मंगल कार्यालयाचे संचालक करतात. त्यामुळे मेहनत करणारे कार्यकर्ते सोबत नसणाऱ्यांना पॅकेज हा उत्तम पर्याय आहे. कन्यादान मंगल कार्यालयामध्ये ही विशेष सुविधा आहे.

मंगल कार्यालये, नाट्यगृहावर भर
समाजाच्या मंगल कार्यालयापेक्षा खासगी मंगल कार्यालय, नाट्यगृहात लग्न साेहळा करण्यावर भर दिला जात आहे. नंदुरबार शहरात पोरवाड वाडी, तैलिक मंगल कार्यालय, नगर पालिकेचे इंदिरा मंगल कार्यालय, सीबी लॉन्स, कन्यादान मंगल कार्यालय, छत्रपती शिवाजी नाट्य मंदिर, सुवर्णकार मंगल कार्यालय, मंगल भुवन, दंडपाणेश्वर मंदीर मंगल कार्यालय, नीलेश लॉन्स, व्ही.जी. लॉन्स, संत गजानन महाराज मंदीर मंगलकार्यालय, ब्राह्मणवाडी येथे लग्नांसाठी बुकिंग करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...