आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक नुकसान टाळण्यात आले:तळोद्याचे ते अनुत्तीर्ण विद्यार्थी झाले उत्तीर्ण

तळोदा19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यापीठाला चूक लक्षात आणून दिल्यानंतर तळोदा येथील समाजकार्य महाविद्यालयातील नापास विद्यार्थ्यांना पास करून त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यात आले आहे.तळोदा येथील समाजकार्य महाविद्यालयात १०० टक्के विद्यार्थी सोशिअल जस्टीस आणि सोशिअल वेल्फेअर ह्या एकाच विषयात नापास झाले होते. व एका पेपर १०० टक्के उपस्थिती असून देखील जवळपास ६० टक्के विद्यार्थी गैरहजर दाखवण्यात आले होते विद्यापीठाच्या ह्या तांत्रिक चुकांमुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार होते.

२०२० साली ही बीएसडब्ल्यूच्या १०० टक्के विद्यार्थ्यांना एकाच विषयात नापास करण्यात आले होते, तेव्हा ही त्यांची चूक लक्षात आणून देण्यात आली होती. आताही अनेक विद्यार्थी नापास झाले आहेत, असे लक्षात आले असता विद्यार्थ्यांनी कुलगुरूंकडे धाव घेतली आणि चुकीचा निकाल तपासून पुन्हा नव्याने निकाल लावण्यासंदर्भात निवेदन दिले. या वेळी नीलेश हिरे, योगेश अहिरे, भूषण घुगे, हितेश साळी, मयूर मराठे, जान्हवी परदेशी, अश्विनी गोसावी आदी विद्यार्थी उपस्थित होते. यात विद्यापीठाचे चुक लक्षात आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...