आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नंदुरबार-खांडबारा रस्त्यावर ढेकवद गावानजीक समोरून येणाऱ्या मोटरसायकलीला वाचवण्याचा प्रयत्नात कार चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला. तर तालुक्यातील भांगरपाडा नजीक मोटरसायकलीची समोरासमोर धडक चार युवक जखमी तर चिंचपाड्यातील महामार्गावर मोटरसायकलीचा अपघात दोन युवक जखमी झाले. अशा तीन अपघातात सात युवक जखमी झाले आहेत. नवापूर तालुक्यात शनिवार अपघात वार ठरला आहे.
नंदुरबार-खांडबारा रस्त्यावर ढेकवद गावानजीक समोरून येणाऱ्या मोटरसायकलीला वाचवण्याचा प्रयत्नात कार चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला. यात चालक जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास शिरपूरहुन गुजरात राज्यातील सुरतकडे जात असताना नंदुरबार-खांडबारा रस्त्यानजीक टेकवद गावाजवळ अपघात झाला. समोरून येणाऱ्या एका मोटरसायकलला वाचवण्याच्या प्रयत्नात कार क्रमांक एम एच १८ बीसी ८४८४ अनियंत्रित होऊन रस्त्याचा बाजूला शेतात फेकला गेल्याने चालक जितेंद्र शिरसाठ जखमी झाले आहे. रस्त्यावरील वाहन चालकांनी मदत कार्य केले. क्रेनच्या मदतीने कार शेतात काढून जखमी जितेंद्र शिरसाठ यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही कारमध्ये केवळ चालक होते.
भांगरपाडा नजीक मोटारसायकलीची समोरासमोर धडक; चार युवक गंभीर जखमी
नवापुर तालुक्यातील सोनारे-भांगरपाडा रस्त्यावर शनिवारी दुपार दोन वाजेच्या सुमारास दोन मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने चार युवक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना प्राथमिक उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात 108 रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रवाना करण्यात आले. यात दोन्ही मोटरसायकलीचे प्रचंड नुकसान झाले आहे. यात रितेश बापू गावित, (वय 20), गुरुदास कृष्णा वसावे (वय 22), लालसिंग सिंगा वसावे (वय 45) , छगन येसु वळवी (वय 28) हे जखमी झाले आहेत. अपघातग्रस्तांना गुजरात राज्यातील बारडोली व नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
चिंचपाडा महामार्ग अपघातात दोन युवक जखमी
नवापूर तालुक्यातील धुळे-सुरत महामार्गावरील चिंचपाड्यात मोटरसायकलीचा अपघात झाला. यात दोन युवक जखमी झाले. त्यांना उपचारार्थ विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात कपिल गावित (वय 18) , विष्णू प्रतापसिंह गावित (वय 20) हे दोन्ही युवक जखमी झाले आहे. दोघांना हाता पायाला दुखापत झाल्या असून ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. नवापूर तालुक्यांमध्ये भरधाव वेगाने मोटरसायकल चालवणे, स्पर्धा लावणे या घटना वाढू लागल्याने अपघात होऊन तरूण मंडळी जखमी होत असून अनेकांचे बळी जात आहे. वाहतूक शाखेचे पोलिस, विसरवाडी पोलीस व नवापूर पोलिसांनी यासंदर्भात दंडात्मक कारवाई उपायोजना संदर्भात कठोर पावले उचलावी अशी मागणी पालकांकडून होत आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.