आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्याघ्र दिन साजरा:श्रॉफ हायस्कूलमध्ये व्याघ्र दिन कार्यक्रम

नंदुरबार6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

थील सार्वजनिक शिक्षण समिती संचलित श्रीमती हि.गो. श्रॉफ हायस्कूल येथे विपनेट सायन्स क्लब इग्नाइटेड माइंड्सद्वारे आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा करण्यात आला.

औचित्य साधून आयाेजित कार्यक्रमात जी.टी. पाटील महाविद्यालयाचे प्राणिशास्त्र विभागातील प्रा.संदीप बडगुजर यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी वाघांचे पर्यावरणातील व भारतीय संस्कृतीत असलेले महत्त्व, त्यांच्या प्रजाती, प्रकल्प, संरक्षण व संवर्धन करण्याची आवश्यकता त्यांनी समजावून सांगितली. तसेच मुख्याध्यापिका सुषमा शाह यांनी पर्यावरण आणि मानव यांचा सहसंबंध तसेच नैसर्गिक अधिवास व परिसंस्थेतील सामंजस्य राखण्यासाठी वाघांचे संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे, असे नमूद केले. शाळेचे शिक्षक राहुल वडनेरे यांनी विद्यार्थ्यांना वन विभागातील नोकरीच्या संधी याबाबत मार्गदर्शन केले. संयोजन विपनेट क्लब समन्वयक राजेंद्र मराठे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...