आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:थुंकताना तोल गेल्याने ट्रॅक्टर चालक ठार

नंदुरबार3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ट्रॅक्टर चालवत असताना थुंकणाऱ्या चालकाचा तोल गेल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याचा मृत्यू आेढवला. ही घटना बलवंड गावाच्या शेतात शनिवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली. छाेटू अक्वीत बच्छाव (वय ४६) रा.ऐचाळे, ता.साक्री असे मृत चालकाचे नाव आहे. ट्रॅक्टर चालक बच्छाव उभा राहून ट्रॅक्टर (क्र. एमएच १८ बीआर ७१२८) चालवत होता.

डाव्या बाजूला थुंकताना त्याचा तोल गेल्याने ताे खाली पडून चाकाखाली सापडल्याने ठार झाला. ऐचाळे, ता.साक्री जि.धुळे येथे राहणाऱ्या हिरामण दगा बच्छाव यांच्या फिर्यादीवरून अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पाेलिस तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...