आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील मुख्य रस्त्यावर गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. अक्कलकुवा येथून येणाऱ्या व्यापारीचे मालवाहू ट्रक वाहने बेशिस्तपणे लावली जात असल्याने धडगाव शरातील होळी चौक, बाबा चौक, कॉलेज रोड या परिसरात दररोज रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन वाहनांची रांगच रांग लागत आहे. यामुळे वाहनधारकांसोबत, सामान्य व्यक्तीना मार्गक्रमण करताना मोठी कसरत करावी लागत असते. या मार्गावरील बराच वेळा रुग्णावाहिकेलादेखील मार्ग काढण्यासाठी अडसर निर्माण होत असते.
धडगाव शहरातील व्यापाऱ्यांना अक्कलकुवा येथील व्यापाऱ्यांकडून मालाचा पुरवठा करण्यात येतो. दरम्यान पुरवठा करणाऱ्या व्यापाऱ्यांची अवजड वाहने शहरातील प्रत्येक दुकानासमोर लावून माल उतरवला जातो. यासाठी कुठेही वाहन उभे केले जाते. अवजड वाहनांचे चालकाला कोणाचीही भीती नसल्यासारखे ते शहराचा मुख्य मार्गावर आपली वाहन लावून किराणा माल उतरवत असल्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी होऊन शहराची डोकेदुखी वाढली आहे. यात वाहतुकीच्या नियमांना धाब्यावर बसवले जाऊन शहरभर वाहन कुठेही उभे केले जात असल्याने लवकरात लवकर या अवजड वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.