आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमण हटाव:दुकानासमोरील फलक, साहित्य काढण्यासाठी 375 दुकानदारांना वाहतूक पोलिसांची नोटीस

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात अतिक्रमणाने मोठा विळखा घातला असून यामुळे शहरातील वाहतुकीची शिस्त बिघडली आहे. आधीच व्यापारी संकूलासमोर वाहनांच्या रांगा त्यात पुन्हा स्वत:च्या दुकानांची जाहिरात करणारे फलक रस्त्यावर लावण्यात आल्याने वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. यातून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. पावसाळ्यापूर्वी अतिक्रमण किंवा अडथळे ठरणारे साहित्य हटवण्याची मोहिम आता वाहतूक पोलिसांनी हाती घेतली असून ३७५ दुकानदारांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. दरम्यान त्यावर दुकानदारांकडून काय खुलासा व कार्यवाही होते, यावर पुढील नियोजन अवलंबून राहणार ऑहे. साहित्य हटवले नाही तर कारवाई दुकानांसमोर बोर्ड, साहित्य, दुचाकी, चारचाकी वाहने, हातगाड्या उभ्या केल्याने वाहतुकीला अडथळा होतो. वाहतूक पोलिस निरीक्षक यांनी विविध व्यापारी संकुलासमोर ठेवलेल्या साहित्यासह दुचाकी वाहन हटवण्याबाबत नोटीस बजावली आहे. त्यानंतरही साहित्य हटवले नाही तर कारवाई करू, असे नोटीसीत नमूद ऑहे.

फुटपाथवरही अतिक्रमण खोडाईमाता परिसरात फूटपाथवर अनेकांनी दुकाने थाटले असून ती दुकानेही हटवण्याची मागणी होत आहे. अवजड वाहतुकीला शहरातून परवानगी नाकारण्यात येईल. काही भागात पार्किंगची सुविधा करण्यासाठी पालिकेने पुढाकार घ्यावा,असे पोलिस विभागाने सूचित केले आहे.

अपघातानंतर पोलिसांकडून दखल पोलिस विभागाने अतिक्रमण हटवण्यासंदर्भात या आधीच मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. नंदुरबार शहरात मोठा मारूतीजवळ एसटी बसने एका दुचाकीस्वाराला उडवल्यानंतर अतिक्रमण, बेशिस्त वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला होता. पावसाळा सुरू होण्यापूर्वी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्याचे संकेत पालिकेने दिले होते.

या आधी एकेरी वाहतूक, विषम तारखेला पार्किंग असे उपक्रम राबवण्यात आले. कोरोना काळात पोलिस अधीक्षक पंडित यांची बदली झाली. पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील यांच्यासमोर वाहतूक कोंडी, दुचाकी वाहनांच्या चोऱ्या, डाकीण प्रश्न आदी प्रश्न चर्चिले गेले होते. वाहतूक प्रश्नाची पोलिसांनी उशिरा का होईना दखल घेतल्याने समाधान व्यक्त होत आहे. आता पालिका व पोलिसांनी संयुक्त अतिक्रमण हटाव मोहीम राबवावी.

शिस्त लावण्यासाठी उपाययोजना ^जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या निर्देशानुसार वाहतूक शाखेने नोटीस बजावली. तसेच एकेरी मार्ग, अवजड वाहनांना बंदी हे उपाय सुचवले. रस्त्यांवर पांढरे पट्टे मारू. -सुनील नंदवाळकर, पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा, नंदुरबार

बातम्या आणखी आहेत...