आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील खैरवे गाव रोटरी क्लब ऑफ नंदुरबारने दत्तक घेतले असून त्या गावातील शाळेला क्लबच्या वतीने सहा संगणक, एक दूरदर्शन संच, तीन खोल्यांना रंगरंगोटी, २८ बेंच, सहा टेबल, १० खुर्च्या व ४० हजार रुपये किमतीची पुस्तके असा एकूण चार लाखांचे साहित्य पुरवण्यात आले आहे. त्याच्या हस्तांतराचा सोहळा रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष यशवंत स्वर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच योजकचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.गजानन डांगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष राजेश पुजारा, खजिनदार डॉ.निर्मल गुजराथी, पंकज पाठक, सेक्रेटरी उदया शाह, चावरा इंग्रजी शाळेचे प्राचार्य केणी, अॅड.नीलेश देसाई, प्राचार्य राजेेंद्र कासार, अशोकराव टेंभेकर, लताबाई टेंभेकर आदी मान्यवर उपस्थित होते. कोरोना काळाच्या आधी याहा मोगी उन्नती संस्था संचालित माध्यमिक शाळेला विविध साहित्य पुरवण्यात आले हाेते. रोटरी इंंटरनॅशनलच्या ग्लोबल ग्रेट मॅचिंग अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमामधून हॅप्पी स्कूल प्रोजेक्ट राबवण्यात आला.
त्यासाठी रोटरी क्लब पुणे मिडटाऊन डिस्ट्रिक्टचे सहकार्य लाभले. समन्वयाची जबाबदारी वात्सल्य सेवा समितीकडे साेपवण्यात आली आहे. त्यासाठी पंकज पाठक, आशिष वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली देखरेख केली जाणार आहे. तसेच आठवड्यातून एकदा या शाळेत इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयांचा अतिरिक्त तास तज्ञांच्या मार्फत घेण्यात येणार आहे. विज्ञान प्रोजेक्टसाठीही शाळेच्या दोन विद्यार्थ्यांना दत्तक घेण्यात आले आहे. सूत्रसंचालन श्रीराम दाऊतखाने, चाैधरी यांनी केले.
शाळा, बॅकवाॅटरमुळे खैरवे गावाची विकासाकडे वाटचाल
खैरवे गावाचे धरणामुळे बाधित झाले असून त्याचे पुनर्वसन करण्यात आले. या गावात येथील मूळ रहिवासी व साखर आयुक्तालयाचे निवृत्त संचालक दाजू गावित यांच्या मार्गदर्शनाखाली २००० मध्ये शाळा सुरू करण्यात आली. त्यावेळी या शाळेत १६ विद्यार्थी होते. आता या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढून ३०९ वर गेली आहे. बॅकवॉटरमुळे गाव समृद्ध हाेत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.