आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवघ्या २४ तासांत आरोपीसह बजाज पल्सर ताब्यात:नवापूरला दुचाकी चाेरीचा अवघ्या २४ तासांत छडा

नवापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने चोरीस गेलेल्या दुचाकीचा गुन्हा पाेलिसांनी अवघ्या २४ तासांत उघडकीस आणला. शहरातील लाइट बाजारातील राज मेन्स हेअर आर्ट समोरून एमएच ३९ एके ८१०५ या क्रमांकाची दुचाकी चोरट्याने २६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पळवली होती. याप्रकरणी नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

येथील पोलिस ठाण्याच सपाेनि नीलेश वाघ यांनी तपासाचे चक्र फिरवून अवघ्या २४ तासांत आरोपीसह बजाज पल्सर कंपनीची एक लाख रुपये किमतीची मोटारसायकल जप्त केली. याप्रकरणी आशिष प्रभू गावित, रा.भवरे ता.नवापूर याने तक्रार दाखल केली होती. मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी किरण इंदास ठाकरे, रा.धनोरे, ता.तळोदा यास शनिमांडळ येथून ताब्यात घेतले. त्याने कबुली दिली.

बातम्या आणखी आहेत...