आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:शाळाबाह्य मुलांचा प्राधान्याने शाेध घ्या; खासदार डॉ. हीना गावित यांचे आदर्श पुरस्कार वितरण साेहळ्यात प्रतिपादन

​​​​​​​ नंदुरबार25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण द्यावे. तसेच शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेत दाखल करावे, असे प्रतिपादन खासदार डॉ.हीना गावित यांनी केले.महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने रविवारी आयाेजित आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या.

यावेळी प्राथमिक उपशिक्षणाधिकारी डॉ.युनूस पठाण, नगरसेवक गौरव चौधरी, प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावित, मार्गदर्शक संजय गावित, कार्याध्यक्ष विश्वास देसाई, संघटक गणेश पाटील, महिला आघाडी प्रमुख रूपाली पाटील, कोषाध्यक्ष दिनेश वळवी, धरमदास गावित, महिला संघटक रंजना साबळे, मीनाक्षी वसावे, प्रमिला कोकणी आदी उपस्थित होते.प्राथमिक शिक्षक व विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू, असे त्यांनी सांगितले. उपशिक्षणाधिकारी डॉ.पठाण यांनी प्रहार शिक्षक संघटनेचे या उपक्रमाबद्दल कौतुक केले.

या शिक्षकांना झाले साेहळ्यात पुरस्काराचे वितरण
जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्ये कुमुदिनी फुलसिंग वसावे, अंजने, चेतन मधुकर शिंदे, जि.प. शाळा, कलमाडी, सुनील शिवलाल चित्ते, टेंभे, सुनंदा नामदेवराव निकवाडे, जुने धडगाव, प्रकाश नामदेव माळी, खामचौंदर, ता.नवापूर, केश्वर तुकाराम वसावे, बरडी, ता.अक्कलकुवा, रंजिना हुन्या गावित, भादवड, सुनील नारायण सोनवणे, शेगवे, ता.नवापूर, दयानंद विश्वंभर जाधव, वरूळ, मांगूबाई दाज्या गावित, खोकसा नवापूर, दीपक भास्कर पाटील, तुळाजे, ता.तळोदा, विजय जयसिंग कामडे, चिखलटीपाडा, कैलास प्रल्हाद साळवे, नवे धडगाव, ता.धडगाव या शिक्षकांचा गुणगौरव करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...