आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रद्धांजली:स्व.विनायक मेटे यांना नंदुरबारात श्रद्धांजली

नंदुरबार3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसंग्राम पक्ष व मराठा समाज आरक्षण समितीचे अध्यक्ष, माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. या निधनाची वार्ता कळताच राज्यासह नंदुरबार शहर व जिल्ह्यातील मराठा समाजावर मोठी शोककळा पसरली. त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून नंदुरबार येथील मराठा क्रांती मोर्चा व मराठा समाज नंदुरबार यांच्या वतीने सामूहिक भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी मराठा समाज बांधवांना अश्रू अनावर झाले.

शहरातील जुनी नगरपालिका चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ विनायक मेटे यांच्या प्रतिमेचे पूजन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मराठा क्रांती मोर्चाचे प्रवीण मराठे, हरीश हराळे, नितीन जगताप, नवनीत शिंदे, सूर्यवंशी मराठे पंचमढी मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद मराठे, माजी अध्यक्ष श्रावण मराठे, अखिल भारतीय अभाविप सूर्यवंशी क्षत्रिय मराठा समाज जळगावचे कार्याध्यक्ष जयराम मराठे, महेंद्र मराठे, विशाल मराठे, हर्षल पाटील, भीमसिंग राजपूत, चेतन राजपूत, हिरालाल मराठे, धनसुख मराठे, अल्पेश मराठे, रमेश मराठे, गोरख मराठे, यशराज मराठे, जगन मोरे, चंद्रकांत बोराणे, प्रमोद मराठे, ईश्वर खेडे, भाईदास पवार, रमेश चौधरी, भानुदास मराठे, गणेश मराठे, प्रकाश मराठे, रोहित पाटील, सुनील भवर, हिरालाल मराठे, दिनेश पवार, पिंट्या मराठे, दीपक मराठे, हेमंत कदम, जय शिंदे व समाजबांधव उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...