आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:देशभक्तीपर गीतातून शहिदांना वंदन; नंदुरबारला एक शाम शहिदो के नाम कार्यक्रम

नंदुरबार19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील बालवीर चौक परिसरातील शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे शहीद दिनाच्या पूर्वसंध्येला ‘एक शाम शहीदो के नाम’ कार्यक्रमास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.यंदा ९ सप्टेंबर रोजी शहिंदांच्या बलिदानाला ८० वर्ष पूर्ण झाली. या पार्श्वभूमिवर शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे एक शाम शहीदो के नाम या देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या हस्ते भारतमाता आणि हुतात्मा शिरीषकुमार प्रतिमा पूजनाने करण्यात आले.

या वेळी शहर पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त अभियंता आर. एस. प्रजापत, कल्पना प्रजापत, डॉ. काणे प्राथमिक हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सुलभा महिरे उपस्थित होत्या. प्रारंभी श्री गणरायाच्या आरतीनंतर देशभक्तीपर गाणे सादर करण्यात आले. सूरचैतन्य आर्केस्ट्रा ग्रुपतर्फे एसटी महामंडळातील गायक कलावंत संजय मोरे, एम.एम.सय्यद, मनोज बाविस्कर, मनोज खैरनार, तसेच राजेश मछले आणि वंदना चित्ते यांनी विविध देशभक्तीपर गीते सादर केली.

याप्रसंगी रसिकांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला. कार्यक्रम यशस्वितेसाठी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे, अशोक यादबोले, डॉ. गणेश ढोले, संभाजी हिरणवाळे, गोपाल हिरणवाळे, सुदाम हिरणवाळे, विशाल गवळी, धीरेन गवळी , सिद्धू नागापुरे आदींनी संयोजन केले. सूत्रसंचालन लीना हिरणवाळे हिने केले. आभार भाग्यश्री यादबोले मानले.

बातम्या आणखी आहेत...