आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:चरणमाळ घाटात ट्रक कोसळला; चालक ठार

नवापूर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील चरणमाळ घाटात कांद्याने भरलेला ट्रक शनिवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास उलटला. यात चालकाचा मृत्यू झाला तर सहचालक गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.ट्रक क्रमांक (आरजे २१, जीसी ४७७१) मालेगावकडून राजस्थानकडे कांदे भरून जात असलेला ट्रक तीव्र उतारावर अनियंत्रित झाल्याने घाटात कोसळला आहे.

यात ट्रक डिव्हायडरचा तुटलेल्या भागाला ठोकला गेला. मोठा आवाज झाल्याने आजूबाजूचे गावकरी मदतीला धावून आले. ट्रकचालक हनुमान मोहनराम जाखळ (रा. बिकानेर राजस्थान) याचा मृत्यू झाला आहे. तर सहचालक पूनमचंद गेनाराम सारंग गंभीर जखमी झाला आहे. स्थानिक नागरिकांनी जेसीबीच्या सहाय्याने चालक व सहचालकला बाहेर काढले; परंतु यात चालकाचा मृत्यू झाला. चरणमाळ घाट दुरुस्तीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

बातम्या आणखी आहेत...