आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील यात्राेत्सवा श्री दत्तजयंतीपासून सुरुवात झाली. अवघ्या चार दिवसांत येथील घोडेबाजारात सव्वा कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. दरम्यान माजी पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल यांनी रविवारी घाेडेबाजारास भेट देत घाेड्यावरून रपेटही केली. यंदा घाेडेबाजारात आलेल्या घोड्यांची एकूण संख्या २ हजार इतकी आहे. त्यात रविवारी ५२ घोड्यांच्या विक्रीतून ३० लाखांपेक्षा जास्त उलाढाल झाली.
आजअखेर येथे भरलेल्या घाेडेबाजारातून एकूण ४०० पेक्षा अधिक घोड्यांची विक्री झाली आहे. रविवारी घोडे विक्रीतून विक्रमी नोंद झाली. या वर्षीचा सर्वात महागडा तब्बल ७ लाख रुपयांचा घोडा ग्राहकाने खरेदी केला. हा घोडा उत्तर प्रदेश राज्यातील मथुरा येथील जुम्मानभाई अल्लाबक्ष यांच्या मालकीचा असून तो तामिळनाडू राज्यातील पालिपडियम येथील जे.विजयलक्ष्मी यांनी सात लाख रुपयांत खरेदी केला. या वर्षीचा हा महागडा घोडा ठरला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.