आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक कार्य:नंदुरबार येथे उद्यापासून दोन दिवस ग्रंथोत्सव ; डॉ. विजयकुमार गावीत यांच्या हस्ते होणार उद्घाटन

नंदुरबार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार येथे ५ व ६ डिसेंबर रोजी नंदुरबार ग्रंथोत्सवचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती, ग्रंथोत्सव संयोजन समितीच्या अध्यक्षा तथा जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिली आहे.

५ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता ग्रंथदिंडीने होणार आहे. ग्रंथदिंडीचा शुभारंभ नगराध्यक्षा रत्नाताई रघुवंशी यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, मंदार पत्की यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. ग्रंथोत्सावाचे उद्घाटन सकाळी ११ वाजता राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या विशेष अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावीत तर अध्यक्षस्थानी खासदार डॉ. हिना गावीत राहणार असून या कार्यक्रमास आमदार अमरीश पटेल, डॉ. सुधीर तांबे, किशोर दराडे, आमश्या पाडवी, ॲड.के.सी.पाटील, शिरीषकुमार नाईक, राजेश पाडवी, नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे उपस्थित राहतील.

बातम्या आणखी आहेत...