आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारी:इलेक्ट्रिक मोटर चोरणारे दोघे ताब्यात; पाच मोटारीही जप्त

नंदुरबार18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इलेक्ट्रिक मोटर चोरणाऱ्या दोघांना गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पाच इलेक्ट्रिक मोटरी जप्त करण्यात आल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नंदुरबार शहरातील मनियार मोहल्ला परिसरात सापळा रचला. १८ नोव्हेबर रोजी १२वाजेच्या सुमारास दोन संशयित हातात पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिकच्या गोण्या व सोबत एक लहान मुलांची सायकल घेऊन येताना दिसले.

दोन्ही संशयितांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला पाहून पळण्याचा प्रयत्न केला; परंतु पथकाने दोन्ही संशयितांचा पाठलाग करून शिताफीने पकडले. चंद्रशेखर नथ्थू मेश्राम (वय ३२, रा. चिंचपाडा भिलाटी, नंदुरबार), शाहरुख खान अस्लम खान पठाण ( वय २६, रा. बिस्मिल्ला चौक, नंदुरबार ) असे सांगितले. त्यांना ताब्यात घेण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...