आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संसारोपयोगी साहित्य जळून‎ खाक:दोन घरांना आग लागून‎ साहित्य जळून खाक‎

धडगाव‎12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अक्कलकुवा तालुक्यातील‎ सातपुड्याच्या डोंगराळ भागातील‎ वाडीबार येथे रात्री आठ वाजेच्या‎ सुमारास पिता- पुत्राच्या लागून‎ असलेल्या दोन घरांना आग लागून‎ चांदीच्या दागिन्यांसह सागाच्या‎ साहित्यासह घराला लावलेले खांब‎ व संसारोपयोगी साहित्य जळून‎ खाक झाले.

दोघांचे कुटुंब बेघर‎ झाले असून, यामध्ये त्यांचे लाखो‎ रुपयांचे नुकसान झाले आहे‎ वाडीबार ग्राम पंचायत अंतर्गत‎ असलेल्या वाडीबारच्या जागदापांडा‎ येथील पिता डेडका वसावे व पुत्र‎ लालसिंग वसावे यांचे लागूनच‎ असलेल्या पक्के विलायती कौलारू‎ घराला शुक्रवारी दि. १० मार्च रोजी‎ रात्री आठ वाजता अचानक आग‎ लागल्याने एका पाठोपाठ दोघे घरे‎ जळून नुकसान झाले. मदत मिळावी‎ अशी मागणी सरपंच गणपत वळवी‎ यांनी केली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...