आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:रस्त्यावर थुंकणाऱ्या दुचाकीस्वारांना पोलिसांनी आवर घालणे आवश्यक

बोरद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रस्त्यावरून प्रवास करताना मोटारसायकलस्वार मागच्या बाजूने येणाऱ्यांचा विचार न करता थुंकतात. त्यामुळे ते सरळ मागून येणाऱ्या प्रवाशांच्या अंगावर जाते. त्यामुळे दोघात वादाच्या घटना घडतात.

तळोदा ते बोरद किंवा कुठलाही रस्ता असो रस्त्याने मोटारसायकल द्वारे प्रवास करणारे काही प्रवासी व्यसनाच्या अधीन होऊन माव्याचे सेवन करतात. त्यामुळे मावा न गिळता हे लोक त्याला थुंकीच्या माध्यमातून बाहेर फेकत असतात. हे कृत्य करीत असताना ते मागच्या बाजूने येणाऱ्या प्रवासी किंवा मोटारसायकल स्वारांचा अजिबात विचार करत नाहीत आणि सरळ थुंकून मोकळे होतात. त्यामुळे मागून येणाऱ्या प्रवाशांच्या अंगावर ते उडत असते. पोलिसांनी रस्त्यावर थुंकणाऱ्यांना समज द्यावी, अशी मागणी होत आहे.

बातम्या आणखी आहेत...