आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोटारसायकली पेटवून दिल्याची घटना:शहाद्यात दुचाकी जाळल्या; संशयित कॅमेऱ्यात चित्रित

शहादा16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील रहीम नगर वसाहतीत घरासमोर लावलेल्या दोन मोटारसायकली पेटवून दिल्याची घटना ३० जुलै रोजी मध्यरात्री घडली असून जनरेटर देखील पेटवण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले आहे.

मंडपाचा व्यवसाय करणारे शिवराम मंदिर समोरील रहीम नगरातील वसीम पिंजारी (वय ३५) यांनी त्यांच्या घरासमोर लावलेल्या दोन दुचाकी पेटवून जाळून टाकल्या. याव्यतिरिक्त जनरेटर देखील जाळण्याचा प्रयत्न केला गेला. विशेष म्हणजे हा परिसर दाट वस्तीच्या असल्याने मोठा अनर्थ टळला. परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दोन ते तीन व्यक्ती दिसून येत आहे.घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे, पोलिस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी भेट देऊन पाहणी केली. आरोपींना लवकरात लवकर पकडण्यात येईल असे आश्वासन पोलिस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी परिसरातील नागरिकांना दिले. पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर संशयितांचा शोध घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...