आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिकअप चालक फरार, गुन्हा दाखल:पिकअप वाहन-दुचाकी अपघातात दोन युवक ठार

खांडबारा7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबार-विसरवाडी रस्त्यावरील काळंबा फाट्याजवळ खांडबाऱ्याकडून नंदुरबारच्या दिशेने येणाऱ्या पिकअप वाहनाने (क्र.एमएच १५ डीके ६४५१) समोरुन येणाऱ्या पल्सर कंपनीच्या मोटारसायकलला (क्र.जीजे २६ एस ३०२१) समोरून जाेरदार धडक दिल्याने मोटारसायकलस्वार राहुल केवजी नाईक (वय २६) रा. मोग्राणी, ता.नवापूर व मनेश नासिक पाडवी (वय २०) रा. कोठली ता.जि.नंदुरबार हे दाेघे या अपघातात जागीच ठार झाले. ही घटना मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु दाेघा मोटारसायकलस्वार युवकांना डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला हाेता. या अपघाताची माहिती नंदुरबार पोलिसांना देण्यात आली. या अपघाताबाबत पंकज कमलसिंग गावित यांनी फिर्याद दिली. त्यानुसार फरार पिकअप वाहन चालकाने मोटारसायकल स्वारांना गंभीर जखमी करुन त्यांच्या मृत्यूस व वाहनांच्या नुकसानीस कारणीभूत झाला व अपघाताची कोणतीही खबर न देता पळून गेला म्हणून पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

नंदुरबार उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे, नंदुरबार तालुका पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार, पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक सुरेश सोनवणे व पोलिस अंमलदार यांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेऊन अपघाताचा पंचनामा करून नंदुरबार पोलिस ठाण्यात नाेंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुरेश सोनवणे करत आहेत.

माेटारसायकलचा चक्काचूर;
नंदुरबार-विसरवाडी रस्त्यावर अपघाताच्या प्रमाण वाढल्यामुळे सदर रस्ता हा मृत्यूच्या सापळा बनला आहे. या घटनेत अपघातात मोटारसायकलीचा चक्काचूर झाला असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. प्रत्यक्षदर्शी कडून मिळालेल्या माहितीनुसार फरार पिकअप वाहन चालक हा महावितरण कंपनीचे ट्रान्स्फॉर्मर घेऊन जात होता.

त्याने अपघात झाल्यानंतर तेथून पळ काढला. त्यामुळे त्याच्याविरुद्ध घटनास्थळी रोष व्यक्त झाला. दोन युवकांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त हाेत आहे. पिकअप वाहन चालकास अटक करून कारवाईची मागणी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...