आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्लक्ष:धडगाव येथे सार्वजनिक शौचालयात अस्वच्छता; नागरिकांची व महिला वर्गाची मोठ्या प्रमाणात गैरसोय

धडगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धडगाव शहरातील सार्वजनिक शौचालयात स्वच्छतेचा अभाव असल्याने सामाजिक कार्यकर्ते शिवाजी पराडके यांच्या पुढाकाराने नगर पंचायतीला निवेदन देण्यात आले.

वॉर्ड क्र.१५ मधील सार्वजनिक शौचालय हे सन २०१८ मध्ये पूर्णत्वास आले असून तेव्हापासूनच पाण्याच्या व कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे शौचालय नागरिकांना वापरता येत नाही. शौचालयाची बाहेरून रंगरंगोटी करण्यात आली असून, आत मात्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असून, या ठिकाणी पाण्याचा अभावही दिसून येत आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे. तेथे जवळपास आजूबाजूस दुसरे स्वच्छतागृह नसल्याने नागरिकांची व महिला वर्गाची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

मानवतेच्या दृष्टीने नगर पंचायत धडगाव यांनी लक्ष देऊन नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर शिवाजी पराडके, नवलसिंग पटले, गोस्या पाडवी, दमण्या पराडके, प्रशांत पाडवी, भगतसिंग पराडके, अनिल पावरा, दिल्या तडवी, मनीष पाडवी आदींच्या सह्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...