आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:मोड येथील ग्रामीण बिगरशेती पतसंस्था निवडणूक बिनविरोध

बोरद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोड येथील ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. नवनिर्वाचित संचालकांची सभा सहकार अधिकारी घ. ह. बागल यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

यावेळी जयसिंग देवचंद माळी, तापीबाई जयसिंग माळी, ब्रिजलाल छगन चव्हाण, उखाभाई नारायण चौधरी, सुभाष हरी पाटील, अशोक दुल्लभ चौधरी, राजेंद्र हिंमतसिंग राजपूत, पुरुषोत्तम रामदास चव्हाण, कैलास गोरख पाटील, प्रमिलाबाई प्रभाकर चौधरी यांचे अर्ज आल्यामुळे त्यांना बिनविरोध घोषित करण्यात आले. नवनिर्वाचित सर्व संचालकांचे शब्द सुमनांनी स्वागत करण्यात आले. तसेच चेअरमन पदासाठी जयसिंग देवचंद माळी यांचा एकमेव अर्ज तर व्हा. चेअरमन पदासाठी ब्रिजलाल छगन चव्हाण यांचा एकमेव अर्ज आल्याने चेअरमन व व्हा.चेअरमन पदाची निवड बिनविरोध झाली.

बातम्या आणखी आहेत...