आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आदिवासी समाजातील पावरा डॉक्टर स्नेहमेळाव्याचा अपूर्व उत्साह; दोन राज्यांतून दीडशेपेक्षा जास्त जणांचा सहभाग

धडगाव17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डॉ.उदयसिंग पावरा यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान; अन्य डॉक्टरही सन्मानित

आदिवासी समाजातील पावरा डॉक्टर्सचा स्नेहमेळावा शहादा येथील मीरा प्रताप लॉन्स येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या स्नेहसंमेलनासाठी महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातील पावरा बारेला समाजातील १५० पेक्षा अधिक डॉक्टरांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाची सुरुवात गिरहोण माता व याहा मोगी माता यांचे पारंपारिक पद्धतीने पूजन करून झाली. यावेळी डाॅक्टरांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

पावरा डॉक्टर्स स्नेहसंमेलनाचे महत्त्व, कार्यपद्धती याची माहिती डॉ.विजय पवार यांनी प्रास्ताविकात दिली. तर गिरहोण मातेविषयी संपूर्ण संकलित व ऐतिहासिक माहितीचे महत्त्व डॉ.चंद्रकांत बारेला यांनी पटवून दिले. १२ वरिष्ठ डॉक्टरांचा गौरव आदिवासी पावरा समाजात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या १२ वरिष्ठ डॉक्टर्सना ‘आदर्श डॉक्टर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात वीर आदिवासी क्रांतिकारकांचा जिवंत देखावा उभा करून डॉ.हिरा पावरा, डॉ.जितेंद्र भंडारी, डॉ.राकेश पावरा यांनी आपली कला सादर केली.

मनोरंजक खेळांचे आयोजन
या कार्यक्रमात सर्व डॉक्टर्ससाठी मनोरंजक खेळांचे आयोजनही केले होते. यावेळी डॉ.विजय पवार, डॉ.कांतीलाल पावरा, डॉ.मनोज पावरा, डॉ.सुनील पावरा, डॉ.सचिन पावरा, डॉ.अनिल पावरा, डॉ.मणीलाल शेल्टे, डॉ. हिरा पावरा, डॉ.जितेंद्र भंडारी, डॉ.राहुल वळवके, डॉ.गणेश पवार, डॉ.बलराज पावरा, डॉ.गोविंद शेल्टे, डॉ.भगवान खेडकर, डॉ.नितीन पवार आदी उपस्थित होते.

पुरस्कारांनी डॉक्टर सन्मानित
पावरा समाजाचे वरिष्ठ निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ.उदयसिंग पावरा यांना ‘जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ.महेंद्र चौहान, डॉ.चंद्रकांत बारेला व डॉ.अर्जुन पावरा यांना ‘विशेष कर्तृत्व’ पुरस्काराने सन्मानित केले. तर २५ डॉक्टरांना पदव्युत्तर पदवी संपादनाबद्दल गौरवण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...