आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होळी उत्साहात साजरी:सातपुड्यात अवकाळीचा तडाखा, तरीही ‘काठी’च्या होळीचा अपूर्व उत्साह

नंदुरबार22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अक्कलकुवा तालुक्यातील काठी येथील प्रसिद्ध पारंपरिक राजवाडी होळी साजरी करताना यंदा पावसाने हजेरी लावली. तरीदेखील मोठ्या उत्साहात व जल्लोषात सातपुड्यातील गाव पाड्यांमधून होळीसाठी आदिवासी बांधव पायी येत काठीला पोहोचले. पारंपरिक पद्धतीने रात्रभर नृत्य करून पहाटे सूर्याच्या साक्षीने होळीसाठी बांबूचा दांडा (काठी) नर्मदा काठावरून सुमारे ५० ते ६० किमी पायी आणला जातो. पाच ते सहा दिवस चालणारा हा होळी उत्सव आनंदात साजरा करत असतात. पहाटे होळी पेटल्यानंतर होळीची काठी पूर्व दिशेला पडली, त्यामुळे तो शुभसंकेत असल्याचे मानले जाते.

राजवाडीचे वैशिष्ट्य : घुंगरू, टोप, ढोलकी, मोठा ढोल, मोरपिसांची बासरी, शस्त्र असा पारंपरिक साज परिधान केलेले आदिवासी समूह रात्रभर ढोल, बिरी, पावा, घुंगरांच्या सुमधुर आवाजात तालबद्ध पद्धतीने फेर धरत नृत्य करतात. हातात धाऱ्या, तिरकामठे, कुऱ्हाड, बर्ची (शस्त्र) असतात. तसेच चेहऱ्यावर विविध प्राण्यांचे मुखवटे लावतात. हातामध्ये ढोल, पिपरी, पावरी, बासरी आदी पारंपरिक वाद्यांनी परिसर दुमदुमून जातो. छाया : नितीन पाटील

बातम्या आणखी आहेत...