आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानंदुरबार शहरासह तळोदा, नवापूर, शहादा तालुक्यात सोमवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटसह हजेरी लावली. सुमारे अर्धातस पावसाने हजेरी लावली. यामुळे काही काळ वीजपुरवठा खंडित झाला होता. तर या पावसामुळे रब्बी हंगाम पूर्णपणे धोक्यात आला असून पुन्हा १५ मार्चपर्यंत पावासाची शक्यता आहे. तर तळोदा शहरात उशिरा तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस झाला. शहरासह जिल्ह्याच्या तापमानात वाढ झाली असून दिवसभर ढगाळ वातावरण होते. यंदाच्या हंगामातील सर्वात जास्त तापमान सोमवारी नोंदवले गेले. किमान तापमान १९.५ अंश तर कमाल तापमान ३६.१ अंश सेल्सिअसवर पोहचले. ढगाळ वातावरणामुळे उकाडा जाणवू लागला असून १३, १४ व १५ मार्च दरम्यान हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या आधीच सोमवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे मिरची पथारीचे मालक चिंतेत आहेत. गत आठवडयात पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतीचे फार मोठे नुकसान झाले. पन्हा पुढच्या तीन दिवसांत पावसाची शक्यता आहे.
त्यामुळे या पावसाचा फटका मिरची पथारीला बसू शकतो. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार १३ ते १५ मार्च दरम्यान नंदुरबार जिल्हयात पावसाची शक्यता वर्तवली आहे. वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हरभरा, गहू या पिकांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावी, असा सल्ला कोळदा येथील जिल्हा कृषी विज्ञान केंद्राने दिला आहे.
मिरचीचा हंगाम संपण्यावर
मिरचीची पिकांची यंदाच्या हंगामात सांगता होत आहे. त्यामुळे मिरची पथारीवर कमी मिरची वाळायला टाकण्यात आली आहे. जर जोरदार पाऊस पडला तर मिरची पथारीवरील मिरचीला धोका पोहचू शकतो. मिरचीचे किती नुकसान होऊ शकेल, हे आज सांगू शकत नाही. संदीप जायस्वाल, मिरची व्यापारी, नंदुरबार
या पिकांना आहे धोका
नंदुरबार, नवापूर, अक्कलकुवा, धडगाव, शहादा व तळोदा या सर्वच तालुक्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गहू,रब्बी मका, हरभरा, उन्हाळी मुग, भुईमुग, तीळ,बाजरी, पपई,केळी, मिरची या सर्वच पिकांच्या बाबतीत कृषी सल्ला देण्यात आला आहे. गहू, रब्बी मका,ज्वारी,हरभरा ही पिके परिपक्व झाली असतील तर पिकांची कापणी करून सुरक्षित जागेवर पिक ठेवावे. उन्हाळी मुगाची पेरणी १५ मार्चनंतर करावी. वादळी पाऊस येणार असल्याने गुरांना सुरक्षित जागेवर ठेवावे, असा इशारा दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.