आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजवळ येत चाललेल्या मकर संक्रांतीमुळे आबालवृद्धांना पतंगाेत्सवाचे वेध लागले आहेत. येत्या १५ जानेवारी रोजी संक्रांत असल्याने शहरात जवळपास पतंग विक्रीसाठी २५ दुकाने थाटण्यात आली आहेत. नायलॉन मांजावर बंदी घातलेली असताना अनेक भागात छुप्या पद्धतीने नायलॉनची विक्री होत असल्याने आतापर्यंत दोन पतंग विक्रेत्यांविरोधात पोलिसांनी कारवाई केल्याने नायलॉन विक्री करणाऱ्यांना जरब बसणार आहे. पतंगांवर यंदा पुष्पा, मोटू-पटलू, तारक मेहता का उलटा चष्मा, स्पायडर मॅन आदी चित्रे छापण्यात आली आहेत. मात्र यंदा काेणत्याही राजकीय नेत्याचे चित्र पतंगांवर नसल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान यंदा कागदाच्या दरात भाव वाढ झाल्याने पतंगाचे दरही १५ टक्क्यांनी वधारले आहेत. काेराेनाची भीती संपल्याने यंदा पतंगाेत्सवात माेठी उलाढाल हाेण्याचा विक्रेत्यांचा अंदाज आहे.
नायलाॅन मांजावर कारवाई हाेणार दरम्यान गेल्या पाच वर्षांपासून नायलॉन मांजावर शासनाने बंदी घातली आहे. तरी देखील छुप्या पद्धतीने मांजा विक्री होत असल्याने पोलिसांनी हेल्पलाईन उघडली आहे. छुप्या पद्धतीने मांजा विक्री केल्याची माहिती पोलिसांना दिल्यास अशा पतंग विक्रेत्यांवर कारवाई केली जाणार असून पतंग विक्रेत्यांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे यंदा कमी प्रमाणात हा धागा विक्री हाेण्याचा अंदाज असून शासनानेच या मांजावर बंदी घातली आहे.
पतंग मुखवट्यामुळे वाढताे आनंद यंदा पतंग उडवणाऱ्यांसाठी मुखवटे विक्रीसाठी आले आहेत. एक आनंद म्हणून नवीन क्रेझ या मुखवट्यांमध्ये आली आहे. वाघांच्या चेहऱ्याचे मुखवटे विक्रीसाठी आहेत. लहान मुलांमध्ये या मुखवट्यांची क्रेझ आहे. तर एके ५६, २४ कॅरेट, पांडा, बाजीगर अशा नावाचे धाग्यांचे रिल उपलब्ध असून २४०, ३५० रुपये असे त्यांचे दर आहेत. हजार वार, पाचशे वार अशा नावाने हे रिल विक्री होतात. मांजा तयार करण्यासाठी प्रत्येक दुकानदारांकडे मजूर उपलब्ध आहेत.
काेराेनाचे भय संपले, उत्साहामुळे पतंग विक्रीत हाेणार वाढ माझ्या वडिलांपासून आम्ही पतंग व्यवसाय करत आहोत. कोराेना काळात पतंग विक्रीवर संक्रांत आली होती. मात्र काेराेनाचे भय संपल्याने यंदा पतंग उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होईल. सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले आहेत. महागाई वाढली तरी युवक शौक कमी करत नाहीत. त्यामुळे पतंग विक्रीत वाढ होण्याचा विश्वास आहे. -बलराम पवार, पतंग विक्रेता, नंदुरबार.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.