आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेळांमुळे शरीर सुदृढ राहण्यास मदत:क्रीडा उत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी अप्पर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांचे मत

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत खेळातही सहभाग नोंदवावा. खेळामुळे शारीरिक व बौद्धिक वाढ होत असते. शरीर निरोगी व सुदृढ राहण्यास मदत होते, असे प्रतिपादन अप्पर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांनी येथे केले.पी. जी. पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा उत्सवाचे जल्लोशात आयोजन करण्यात आले. त्यावेळी तांबे बाेलत हाेते. गेल्या दोन वर्षांत कोरोनाच्या सावटामुळे विद्यार्थ्यांना खेळापासून वंचित रहावे लागले. त्यामुळे पी.जी. पब्लिक स्कूलमध्ये या शैक्षणिक वर्षात वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्ह्याचे अप्पर पाेलिस अधीक्षक तांबे यांनी भूषवले. संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष ॲड. रुद्रप्रताप रघुवंशी तसेच प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक सिद्धार्थ रघुवंशी हे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...